
रक्त गट तपासणी
जळोची येथील प्रेरित फाउंडेशन व श्री संत सावता माळी तरुण मंडळा च्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले.
रक्त गट तपासणी शिबिर
बारामती :- (जळोची) दिनांक ०६/०९/२०२२ रोजी बारामती तालुक्यातील जळोची येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन
जळोची येथील प्रेरित फाउंडेशन व श्री संत सावता माळी तरुण मंडळा च्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. या रक्तगट तपासणी शिबिराकरिता अष्टविनायक लॅबरोटरीचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी महेश साळुंके, डॉ. संतोष शिंदे, डॉ. गीतांजली शिंदे, निखिल होले, पांडुरंग कुदळे, विजय जमदाडे, दादासाहेब दांगडे, विजय फरांदे, धनंजय जमदाडे, नवनाथ जमदाडे, संदीप जमदाडे, आदित्य जमदाडे, श्रीरंग जमदाडे, आकाश जमदाडे, तुषार जमदाडे, भाऊ बनकर, संदीप कुदळे ह्या सर्वांचे सहकार्य जोडीला होते.