प्रेरित फाउंडेशन ची कार्यप्रणाली
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये त्याची जडण घडण होत असते. तो समाजातील विविध व्यक्तींकडून, घटकांकडून अनेक गोष्टी शिकत असतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो व त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समाजाचे फार मोठे ऋण असते. या समाज ऋणातून उतराई व्हायचे असेल तर समाजासाठी योगदान देणे क्रमप्राप्त असते. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. अलीकडे शिक्षण व आरोग्य यांचा समावेश ही मूलभूत गरजांमध्ये करण्यात आला आहे. या गरजांपासून कित्येक लोक वंचित राहतात. अशा गरजूंना प्रेरित करून त्यांचे दुःख कमी करू शकल्यास आपण सामाजिक ऋणातून काही अंशी मुक्त होऊ शकतो. या भावनेतूनच प्रेरित फाउंडेशन उदयास आले आहे.